शेती पिकवा मालामाल व्हा आणि बक्षीसही जिंका! उत्पादन वाढीसाठी पीक स्पर्धेचे आयोजन
पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी काही भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग होतात अशा शेतकऱ्यांना उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन गौरव केला जातो. तसेच त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अध्यायवत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन जिल्ह्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा आयोजन राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने खरीप हंगाम 2023 मध्ये सर्वसाधारण आदिवासी गटासाठी खरीप. ज्वारी, तूर, मूग, उडीद,सोयाबीन, यासाठी पीक स्पर्धा आयोजीत होणार आहे.
![]() |
| Crop Competition Of Maharashtra-2023 |
Crop Competition Of Maharashtra-2023
नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण पीक स्पर्धे बद्दल जाणून घेणार आहोत. या स्पर्धा चा उद्देश म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप महत्तवाचा आहे याचे प्रमुख कारण असे कि या शेतकऱ्यां मध्ये एक उमेद तयार होते जेणेकरून शेतकरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या उत्पादन क्षमता वाढवू शकतील.
या स्पर्धे मध्ये अनेक शेतकरी भाग घेऊ शकतील जेणेकरून त्याच्या मध्ये उत्पादन वाढीसाठी स्पर्धा लागेल व ते आपले उत्पादन वाढवू शकतील.
ह्या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकरी आपली बक्षीस जिंकू शकतील. व त्या बक्षीस मुळे त्याच्यात नवी उमेद तयार होईल. व प्रत्येक शेतकरी ह्या बक्षीस साठी प्रत्येक वर्षी पर्यन्त करेल अशी अशा सरकारला आहे. हे निश्चित आहे.
या स्पर्धा मध्ये खालील पीकचा समावेश करण्यात आला आहे 'Crop Competition Of Maharashtra-2023'
➡️पीक स्पर्धेतील पिके.
ह्या स्पर्धे मध्ये काही खरीप पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ती पिके खालील प्रमाणे आहेत.
खरीप ज्वारी तुर मूग उडीद व सोयाबीन ( एकूण पाच पिके )या स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकांचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे.
तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
स्पर्धक संख्या पीक स्पर्धा क्षेत्र कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या फिक्स स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांचे स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली या 40R क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
Crop Competition Of Maharashtra-2023
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय ( प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र ) रक्कम 300 राहील तालुका स्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी आल्यास पीक स्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल.
👇👇👇👇👇👇👇
खरीप हंगाम दुय्यम तसेच पौष्टिक तर धान्य पिकाच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे ही बाब विचारत घेऊन पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्याने सहभागी व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या अधीनस्त, कृषी सहाय्यक मंडळ, कृषी अधिकारी, किंवा तालुका कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क साधावा.
प्रत्येक शेतकऱ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग घ्यावा जेणेकरून प्रत्येकाला याचा लाभ मिळेल आणि बक्षीस मिळवता येईल. आपली उन्नती साधता येईल हे विशेष.Crop Competition Of Maharashtra-2023
➡️अर्ज दाखल करण्याची तारीख.
खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.
मुग उडीद या पिकासाठी 31 जुलै तर खरीप ज्वारी तूर सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल.
तालुकास्तरावर जिल्हा स्तर राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
Crop competition prize
बक्षीस स्वरूप.
💁♂️सर्वसाधारण व आदिवासी तालुका पातळी गट बक्षीस रुपये पहिले 5000 दुसरे 3000 व तिसरे 2000 जिल्हा पातळी पहिले 10 हजार दुसरे 7000 व तिसरे 5 हजार राज्य पातळी पहिले ₹50,000 दुसरे 40,000 व तिसरे 30 हजार रुपये राहील.
👉इथे ही स्पर्धा इच्छिक असेल यासाठी कुठलाही दबाव नसेल.आणि इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा."Crop Competition Of Maharashtra-2023"तरी इच्छुक शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
👉तरी इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क करून सहभागी व्हावे या स्पर्धेसाठी मूग व उडीद या पिकासाठी 31जुलै ही शेवटची तारीख असेल.
👉ज्वारी तूर आणि सोयाबीन या पिकासाठी 31ऑगस्ट ही अंतिम मुद्दत असेल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.