Recruitment Of Health Department-2023:-
मागील तीन वर्षापासून रखडलेले आरोग्य विभागाची अखेर भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने आरोग्य विभागाबद्दल मोठी घोषणा केली आहे आरोग्य विभागात तब्बल दहा हजार 949 पदाची भरती प्रक्रिया होणार आहे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकारांनी भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे.
![]() |
| Recruitment Of Health Department-2023 |
➡️क आणि ड गटातील एकूण 10949 पदाची मेगा भरती होणार आहे क सवंर्गातील 55 प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत अशी एकूण दहा हजार 949 पदाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
👉2021 साली ही भरती प्रक्रिया सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकारांनी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
👉महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य भरती पार पडली होती पण या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा समोर आला होता पेपर फुटीचा प्रकार समोर आला होता त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवली होती मध्यंतरी सरकार बदलल्यामुळे भरती प्रक्रिया लांबीवर पडली होती अखेरीस नव्याने भरती प्रक्रिया काढण्यात आली आहे उद्या मंगळवारी आरोग्य विभागाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे
💼 अनेक काळापासून राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात 11 हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात आज जाहिरात निघली आहे. तसेच ही भरती प्रक्रिया TCS मार्फत राबवली जाणार आहे.
👉 सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यकरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
🤗 आरोग्य भरती गेल्या 3 वर्षांपासून रखडली होती. यामध्ये ’क’ आणि ‘ड’ गटातील एकूण 10 हजार 949 पदांची होणार मेगाभरती होणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारचे विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया 2021 मध्ये सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे.
👉१० हजार ९४९ पदांची आरोग्य विभागात भरती! मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली माहिती.
👩🏫 पेपरफुटी आणि अनेक विविध घोळांमुळे गेली तीन वर्षे रखडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १० हजार ९४९ पदे भरली जाणार आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसमार्फत राबवली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी येथे दिली.
🗣️ महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ मध्ये आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता तानाजी सावंत यांनी या भरतीसाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत 'क' आणि 'ड' संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे.
👇👇
| अनु. क्रं | आरोग्य विभाग | पदसंख्या |
|---|---|---|
| 1) | *उपसंचालक, आरोग्य सेवा मुबंई मंडळ,ठाणे. | 804 |
| 2) | *उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ,पुणे. | 1671 |
| 3) | *उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक. | 1031 |
| 4) | *उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ,कोल्हापूर. | 639 |
| 5) | *उपसंचालक, आरोग्य सेवा छ. संभाजीनगर मंडळ,छ. संभाजीनगर.. | 470 |
| 6) | *उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर मंडळ,लातूर. | 428 |
| 7) | *उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळ,अकोला. | 806 |
| 8) | *उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर मंडळ,नागपूर. | 1090 |
| 9) | *आरोग्य विभाग शिपाई, कामगार ग्रुप -ड च्या | 4010 |
| एकूण जागा | 10,949 |
📚 शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात पहावी
💰*अर्ज फी :* खुला - ₹ 1000/-
💰*मागास प्रवर्ग :*₹ 900/-
📍 नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
🖨️ अर्ज करण्याची पद्धत :(ऑनलाईन)
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 सप्टेंबर 2023
🌐 अधिकृत संकेतस्थळ :- http://arogya.maharashtra.gov.in
💁♂️प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारंकडून विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
➡️दोन्ही जाहिराती क आणि ड एकत्र देण्यात आल्या आहेत 👇👇👇

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.