Saturday, August 5, 2023

जिल्हा परिषदांमध्ये 19,460 पदांची मेगा भरती! Zilla Parishad Maharashtra Bharti 2023

Zilla Parishad Maharashtra Bharti 2023:-ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची आरोग्य विभागाकडील 100% व इतर विभागाकडील 80% रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कारवाही सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषद मधील गट क मधील 30 संवर्गातील एकूण 19,460 इतकी पदे सरळ सेवेने भरण्याबाबतची प्रक्रिया शनिवार पासूनच सुरू होणार आहे.

या भरतीची जाहिरात शनिवारी 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Zilla Parishad Maharashtra Bharti 2023
Zilla Parishad Maharashtra Bharti 2023

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदे कडील गट क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता व इतर विविध कारणामुळे परीक्षा होऊ शकली नाही


यानंतर शासनाच्या विविध विभागामार्फत प्राप्त झालेल्या सूचनानुसार ग्राम विकास विभागामार्फत ही भरती करण्यात येणार आहे यामध्ये पाच ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवाराकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हापरिषदा मध्ये अर्ज करावयाचा आहे.

💁‍♂️त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचा तपशील पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अहेरता वेतनश्रेणी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत. अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती आदी बाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगनकिकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवारांनी एकाच पदाकरिता अर्ज करावा अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे आवाहनही त्यांनी केले आहे परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्यास येत आहे.


📈जिल्हानिहाय पदांचा उतरता क्रम*
👇👇
Sr. No. जिल्हापरिषद पदसंख्या
1 नाशिक 1038
2 पुणे 1000
3 पालघर 991
4 सातारा 992
5 अहमदनगर 937
6 यवतमाळ 875
7 रायगड 840
8 सांगली 754
9 कोल्हापूर 728
10 रत्नागिरी 715
11 सोलापूर 774
12 अमरावती 653
13 नांदेड 628
14 जळगाव 626
15 गडचिरोली 581
16 बीड 568
17 नागपूर 557
18 519
19 बुलढाणा 499
20 लातूर 476
21 नंदुरबार 475
22 जालना 467
23 धाराशिव 453
24 छ. संभाजीनगर 432
25 वर्धा 371
26 धुळे 352
27 गोंदिया 339
28 सिंधुदुर्ग 334
29 भंडारा 320
30 परभणी 301
31 अकोला 284
32 ठाणे 255
33 वाशीम 242
34 हिंगोली 204
----------------- एकूण पदसंख्या 19,460


👉19 हजार 460 पदांची माहिती वाचा सविस्तर

👉अर्ज फी :- जनरल/खुला ₹1,000/- इतर कॅटेगरीOBC [SC/ST/PWD: ₹900/-] 

 📝फॉर्म भरण्यासाठी लिंक*

▪️Start Date-05/08/2023
▪️End Date -25/08/2023



🏤34 जिल्हा परिषद जाहिराती फक्त एकाच ठिकाणी
👇👇

No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ...