Recruitment For 2541 Posts Under Mahapareshan:-महापारेषण' म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत महा-पारेषण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत महाभरतीचे नियोजन करण्यात आले आहे. या महाभरती मध्ये तब्बल 2541 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये 'विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ वर्ग १, तंत्रज्ञ वर्ग २' अशा पदांचा समावेश आहे. नुकतीच याबाबत 'महापारेषण' ने याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
![]() |
Recruitment For 2541 Posts Under Mahaparesha |
या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
💼 विभागाचे नाव :–महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023
💁♀️ पदाचे नाव :– राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:
विद्युत सहाय्यक (पारेषण) - १९०३ जागा
वरिष्ठ तंत्रज्ञ - १२४ जागा
तंत्रज्ञ वर्ग १ - २०० जागा
तंत्रज्ञ वर्ग २ - ३१४ जागा
🔢 एकूण पदसंख्या :– 2541
📚 शैक्षणिक पात्रता :– पदांनुसार.. मूळ जाहिरात पाहावी
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय प्रमाणपत्र धारक.
वेतन: (मासिक)
विद्युत सहाय्यक (पारेषण) - प्रथम वर्ष - १५ हजार, द्वितीय वर्ष - १६ हजार, तृतीय वर्ष -१७ हजार
वरिष्ठ तंत्रज्ञ - ३० हजार ८१० ते ८८ हजार ११९०
तंत्रज्ञ वर्ग १ - २९ हजार ९३५ ते ८२ हजार ४३०
तंत्रज्ञ वर्ग २ - २९ हजार ३५ ते ७२ हजार ८५७
👤 वयोमर्यादा :– 18 वर्षे ते 38 वर्षे
🖥️ अर्ज करण्याची पद्धत :– ऑनलाईन
या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख :– 20 नोव्हेंबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 10 डिसेंबर 2023
🌐 अधिकृत वेबसाईट :– अधिक माहितीसाठी https://www.mahatransco.in/ या वेबसाईटला भेट द्या.
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात अवश्य पाहा.
👇👇

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.