👳शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री खरीप हंगाम पिक विमा योजना. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा हिस्सा आता राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.
👨🌾शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत केवळ एक रुपयांचा विमा हप्ता भरावा लागणार असून, त्या विमा हप्त्यापोटी पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सोयाबीन व कापसासाठी हेक्टरी 55000 हजार रुपयांची रक्कम मिळू शकणार आहे.
💁♂️ही योजना यंदाच्या खरीप हंगामापासून सुरू करण्यात आली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार आहे.
![]() |
| Ek Rupyat Pik Vima |
Ek Rupyat Pik Vima :-
👉राज्य सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्त्याची रक्कम ही राज्य शासन भरणार असून, शेतकऱ्यांना केवळ 'Ek Rupayat Pik Vima' एक रुपयाची विमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून.
💁♂️यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ज्वारी बाजरी मूग उडीद तूर सोयाबीन व कापूस या अधिसूचित पिकासाठी 2023-24 पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्या अनुषंगाने शेतकरी हिश्यातील विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून सोयाबीन साठी हेक्टरी 55000 हजार रुपये विमा मिळणार आहे.
💁♂️मागील काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे या आर्थिक फटक्यातून उभारी मिळवण्यासाठी महाराष्ट्रतील शेतकरी खरीप हंगामात कापूस,तूर, मूग, उडीद, आणि सोयाबीन पिकाची पेरणी करून ही पिके संरक्षित करण्याकडे भर देत आहेत.
👉यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून विमा हप्ता भरण्यासाठी केवळ एक रुपयात पिक विमा योजना जाहीर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपली पिके संरक्षित संरक्षित केल्यानंतर ज्वारीसाठी 29 हजार 750 बाजरीसाठी 25000 सोयाबीन साठी 55,000 मुगासाठी 22 हजार उडदासाठी 22 हजार तुरीसाठी 36 हजार 802 तर कापूस साठी 55 हजार रुपयाची नुकसान भरपाई संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Ek Rupayat Pik Vima :-
एक रुपयात पिक विमा
➡️एरवी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा उतरविताना शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 2000/- हजार रुपयाची रक्कम विमा कंपनीकडे जमा करावी लागत होती परंतु आता शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पिक विमा योजना जाहीर केली आहे त्यामुळे एक रुपयात पीकविमा शेतकऱ्यांना पिके विमा कंपनीकडे संरक्षित करता येत आहेत.
👇👇👇👇👇👇
👨🌾प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये एक रुपयात सहभाग होता येणार आहे पीक पेरणी ते काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती आग गारपीट वादळ हवामानाची प्रतिकूल परिस्थिती यामुळे होणाऱ्या पिकाची नुकसान यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळनार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेऊन आपली पिक विमा संरक्षण करावे.
💁♂️राज्य सरकारने मार्च महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात हा निर्णय घेतला होता. खरीप व रब्बी पीक विम्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.Ek Rupyat Pik Vima
💥आवश्यक कागदपत्रे:
1)7/12 उतारा,8अ.खाते उतारा
2) बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
3) आधार कार्ड
4)स्ववं - घोषणापत्र:
नुकसान भरपाईची एवढी मिळू शकते रक्कम
💥पीक विमा संरक्षित रक्कम
1️⃣कापूस 55000/- हजार रुपये
2️⃣ज्वारी 29750/-हजार रुपये
3️⃣सोयाबीन 55000/- हजार
3️⃣उडीद 22000/- हजार
5️⃣मूग 22000/-हजार
6️⃣तूर 36802/-हजार
7️⃣बाजरी 25000/-हजार
➡️संरक्षित रक्कम
💁♂️३१ जुलैपर्यंत विमा काढण्याची मुदत
शेतकऱ्यांना खरीप पीक विमा १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान काढता येणार असून, शेतकऱ्यांनी हा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. दरवर्षी, राज्यातील शेतकरी खरीप पीक विमा काढत असतात. यंदा शेतकऱ्यांचा हिस्सा शासनाकडून दिला जाणार असल्याने राज्यात विमा काढणाचा शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
Crop Insurence -2023:-
💁♂️पिक विमा योजनेत आत्तापर्यंत 78 लाख शेतकऱ्यांचा सहभाग राज्यातील 50 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित
(हेक्टरमध्ये क्षेत्र संरक्षित कंसात शेतकरी सहभाग)
पुणे :-337577(499228)
नाशिक :-344213(376943)
कोल्हापूर :-45160(85,989)
छत्रपती संभाजीनगर :-1112882(2473438)
लातूर :-1724856(2579615)
अमरावती :-1216917(1500531)
कोकण :-16492(29012)
💁♂️तर पिक विमा भरला जात नाही पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने पोर्टल विकसित केले आहे ई-पिक पाहणी आणि पोर्टल वरील माहितीच्या मदतीने विमा भरला जातो यापूर्वी उसाची साखर कारखान्याकडे नोंद असली तरी अनेक शेतकरी दुसरे पीक दाखवून विमा भरल्याचे प्रकार उघड झाले होते."Ek Rupyat Pik Vima "
💁♂️मात्र आता उसाची कारखान्याकडे नोंद असेल तर इतर पिकाचा विमा भरता येत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांचा अनुभव येत आहे त्यामुळे विम्यात सहभागाच्या गैरप्रकारे आळा बसत असल्याचे दिसत आहे

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.