Pages

Thursday, July 6, 2023

सोयाबीन पिकांमध्ये कोणते तणनाशक वापरावे जाणून घ्या? Types Of Herbicide

👨‍🌾तणनाशक म्हणजे काय?:-

👉तणनाशक हे अवांछित वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव.

Types Of Herbicide
Types Of Herbicide 

नमस्कार शेतकरी बंधुनो आपण सोयाबीन या पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे या बद्दल जाणून घेणार आहोत

💁‍♂️आजच्या युगात सोयाबीन ह्या पीककडे खूप महत्तवाचे पीक म्हणून पहिले जाते.सोयाबीन ह्या पीककडे नगदी पीक म्हणून पहिले जाते.

💁‍♂️सोयाबीन ह्या पिकातील तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी विविध तणनाशकाचा वापर करतात.

🌱तणनाशक कसे वापरावे?:-


👨‍🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरत असताना योग्य ती काळजी घ्यावी. त्यासाठी तणनाशक फवारत असताना पाणी हे स्वच्छ असावे.(माती मिश्रित डबके किंवा नाले यातील पाणी वापरू नये )

💁‍♂️तणनाशकांमध्ये गडूळ पाणी वापरल्यास तन / गवत मरत नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.

💁‍♂️तणनाशक वापरत असताना औषधाच योग्य प्रमाण असले पाहिजेत जर औषधाच योग्य प्रमाण नसेल तर तण मरत नाही.


🌱तणनाशक आणि कीटकनाशकांमध्ये काय फरक आहे?


💁‍♂️नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण तणनाशक विषयी जाणून घेणार आहोत तणनाशकांमुळे तणावर नियंत्रण ठेवल्या जात.
तणनाशक आणि कीटकनाशकां मधील फरक म्हणजे तणनाशका मुळे तणा वर नियंत्रण ठेवल्या जात आणि कीटक नाशकमुळे कीटक आणि रोगावंर नियंत्रण ठेवल्या जात.

👨‍🌾शेतातील तण म्हणजे काय?

पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तण होय.
तणा मुळे शेतकऱ्याच्या उत्त्पदना वर परिणाम होतो. तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा वापर करतात.

💁‍♂️पेरणी जर उशिरा होत असेल आणि नंतर पाऊस सारखा लागून राहिला तर तण व्यवस्थापन करणे हे एक आव्हान सोयाबीन शेती साठी आहे, त्यासाठी पेरणी पूर्वी तण नाशक फायदेशीर ठरू शकतात.


🌱सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तणनाशकांचा वापर केला जातो, हे सर्व करत असताना शेतकरी मित्रांना योग्य माहिती न मिळाल्याने ते वापर करताना चुका करतात व त्याचा फायदा होत नाही बरेच वेळी दोन वेळा शेतकरी तणनाशकांचा वापर करतात.

👉परंतु यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तण नाशक वापरताना योग्य सल्ला घेऊन योग्य प्रमाणात तसेच योग्य वेळी फवारणी करावी जेणेकरून आपल्याला चांगले तण व्यवस्थापन करता येईल.


तणनाशक औषधी नावे :-


🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
सोयाबीन पिकात प्रामुख्याने  उगवणीपूर्वी तसेच उगवणीनंतर असे दोन प्रकारचे तण नाशके वापरले जातात त्यांची माहिती खालीप्रमाणे 👉🏻

*उगवणीपूर्वी वापरण्यात येणारी तणनाशके* 

🔅 *Flumioxazine 50% SC* 
याची पेरणीनंतर ४८ तासाच्या आत आपण फवारणी करू शकतो
याचा १०० मिली प्रती एकर याप्रमाणे  वापर करावा
सोयाबीन व गहू पिकातील गवर वर्गीय व रुंध पानाचे तण नियंत्रण होते

व्यापारी नाव : -Sumimax 

🔅 *Pendimethalin 30 EC* 
750-1000 मिली प्रती हेक्टरी या प्रमाणात फवारणी करू शकता
 30-40 मिली प्रती पंप याप्रमाणे पेरणीनंतर 48 तासांत फवारणी करावी,
हे जवळपास सर्वच पिकामध्ये वापरता येणारे तण नाशक आहे 
व्यापारी नाव :- Panida, Stomp

🔅 *SULFENTRAZONE 28% + CLOMAZONE 30% WP* 
याचा वापर ५०० ग्राम प्रती एकर या प्रमाणात  करावा 
पेरणी नंतर ४८ तासांच्या आत फवारणी करावी 
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण साठी शिफारशीत आहे, 
गवतवर्गिय व रूंध पानाचे तण नियंत्रण करते 
व्यापारी नाव :-Authority NXT ( FMC )

🔅 *Diclosulam 84% WDG* 
याचा वापर १२.४ ग्राम प्रती एकर या प्रमाणात करता येतो
पेरणीनंतर ४८-७२ तासांत फवारणी करू शकता
सोयाबीन व भुईमूग पिकासाठी शिफारशीत ( शेतकरी अनुभवानुसार तुरी मध्येही वापर करू शकता) 
व्यापारी नावे: Strongarm / Dabooch,  Tata mark 

👉🏻 🌱*सोयाबीन पिकात उगवणी नंतर वापरण्यात येणारी तणनाशके*

 *Imazethapyr 10% SL* 
हे एक सुरवातीला आलेले तण नाशक आहे, याचा वापर  ४०० ml प्रती एकर या प्रमाणे करता येतो, परंतु याने लांब पणाचे गवत वाळत नाही त्यामुळे यासोबत आपलयाला इतर तणनाशक वापरावे लागते.
व्यापारी नावे : Persuit, Weed block, Lagam  
रुंध व लांब पानाच्या  तण निंत्रणासाठी यासोबत Targa super # Agil # Wheep super अशा तनांशकाचा वापर करावा लागतो.
प्रमाण -
(Weed block - ४०० ml प्रती एकर +
Agil - २५०-३०० ml प्रती एकर)

👉🏻 *Propaquizafop 2.5%+ Imazethapyr 3.75% w/w ME*

हे दोन क्रियाशील घटक असलेले तण नाशक आहे याने रुंध व लांब पानाच्या दोन्ही तणाचे नियंत्रण होते.
व्यापारी नावे: Shaked ( Adama)
प्रमाण - ८०० मीली प्रती एकर 
८०-१०० ml प्रती पंप एकरी पाण्याचे प्रमाण १५०-२०० लिटर वापरावे 

👉🏻 *Fluazifop-p-butyl 13.4 %EC. ( Fuziflex )* 
हे फक्त सोयाबीन असेल तर वापरण्यासाठी असलेले तण नाशक आहे, तूर असेल तर याचा वापर करू नये.
प्रमाण- ४००-५०० ml प्रती एकर याप्रमाणे  ४० ml प्रती १५ लिटर पंप याप्रमाणे फवारणी करू शकता.

*Odyssey (Imazethapyr 35% + Imazamox 35% WG)* 
सोयाबीन आणि भुईमूग पिकातील सर्व प्रकारच्या तण नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता,
प्रमाण - ४० gm प्रती एकर 

*Iris (Sodium Acifluorfen 16.5% + Clodinafop Propargyl 8% EC)*

सोयाबीन मधील सर्व प्रकारच्या तण नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता.
प्रमाण - ४०० ml प्रती एकर

*AMORA ( Fomesafen 12% + Quizalofop ethyl 3% SC)*

सोयाबीन पिकातील सर्व प्रकारच्या तण नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता.
प्रमाण -  ६०० ml प्रती एकर या प्रमाणे
वरीलप्रमाणे तण नाशके उपलब्ध आहेत, आपले शेतात असलेले गवत तसेच, अंतर पीक यांचा विचार करून योग्य ते तण नाशक आपण निवड करू शकतो.


👨‍🌾महत्त्वाची तणे:महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख तणांची नावे खाली दिली आहेत :-

गवताचे प्रकार :-

1) एकदलवर्गीय :–


शिप्पी, लोना, मरड, घोडकात्रा, पंदाड, हराळी, कुंदा, लव्हाळा, विंचू चिमणचारा.

2) द्विदलवर्गीय :–

दीपमाळ, दुधी, नाठ, कुंजरू, काठेमाठ, माका, हजारदाणी, तांदुळजा, पेटारी, रानताग, उंदीर काणी, शेवरा, चिमटा, रानएरंडी, गाजर गवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथर, चांदवेल, चंदनबटवा इ.

स्वतःची काळजी :-


कोणतीही फवारणी करण्या अगोदर स्वतःची काळजी घ्या.
पूर्ण झाकलेले कपडे ,मास्क, हात मोजे व गॉगल चा वापर करा .

👉टीप :- तणनाशक हे मनुष्य तसेच जमिनी साठी सुद्धा धोक्याचे आहे त्यामुळे होईल तेवढ तणनाशक वापरणे टाळाळे.

बाजारात चांगल्या प्रकारचे तण काढणी यंत्र मिळतात ते वापरून पहावे.






No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.