या वर्षी तणनाशक च्या किंमती मध्ये तब्बल 30% ची घट झाली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी या वर्षी तणनाशक घेताना दुकानंदारांना चौकशी करून तणनाशक घ्यावे.
सध्या शेती शिवारात पीके अंकुरली असून तन नाशक व कीटकनाशकाची फवारणी सुरू आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तन नाशकाच्या किमती तब्बल 30% आणि उतरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
![]() |
| Rate Of Herbicide-2023 |
पाऊस उशिरा आल्याने जिल्ह्यातील पेरण्या लामल्या होत्या सध्या संपूर्ण भागात पेरण्या झाल्या आहेत.
सुरुवातीस पेरणी केलेल्या शेतात पिकासोबत तन वाढले आहे त्यांच्या नियंत्रणासाठी मजुराला पर्याय असणाऱ्या तन नाशकाच्या फवारणीला वेग आला आहे.
तननाशकाच्या 'Rate Of Herbicide ' किमती गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 30% पर्यंत म्हणजेच लिटर मागे शंभर ते दोनशे रुपये उतरले आहेत त्यामुळे शेतकरी सरसकट तन नाशकाचाच वापर करत आहेत.
कंपनीची विचारणा न करता तन नाशक द्या असे शेतकरी म्हणतात अशावेळी दुकानदाराकडून महागडे तन नाशक दिले जाते त्यामुळे किंमत वाढल्याने शेतकरी सांगत असतील पण बहुतांश तन नाशक कंपनीच्या दरात लिटरला शंभर ते दोनशे रुपये दर कमी झाले आहेत.
Rate Of Herbicide-2023:-ग्रामीण भागात मजूर मिळेनात. शेती कामे लवकर उरकण्यात शेतकरी व्यस्त आहेत. पेरणी फवारणी आणि पिकांमधील तन काढण्याच्या कामांना मजूर मिळत नसल्याने हे चित्र आहे ज्यादा मजूर देऊन कामे करावी लागत आहेत शेती कामासाठी मजूर 500 ते 600 रुपये घेत आहेत.
👉या तननाशकां चे दर झाले कमी(प्रति लिटर )
| तणनाशक | पुर्वीचे दर | सध्याचे दर |
|---|---|---|
| राऊंडअप | 650 | 450 |
| ग्लायोफोसट/ ग्लायसेल 41% | 700 | 450 |
| मेट्री (मैत्र्याबुझीन 70%) | 250 | 140 |
मजुरीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत
सापडला आहे दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे जगणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे मजुरी वाढविण्याचे मजुरांनी सांगितले.
तननाशकाच्या किंमती मध्ये घट झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. पण शेतमजूर मिळत नसल्याना शेतकऱ्याचे हाल होत आहेत.
Rate Of Herbicide-2023:-गेल्या वर्षी च्या तुलनेमध्ये जर विचार केला तर तननाशक हे लोकांसाठी वरदान च म्हणावं लागेल त्याचे कारण असे कि शेतकरी सध्या तनमुळं तणनाशकाचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत.
शेतकऱ्यांनी जर तननाशका चा वापर कमी करून सेंद्रिय शेती कडे भर दिल्यास शेतकऱ्यांचा दोन्ही बाजूनी फायदाच आहे त्याचे कारण असे कि शरीराची हानी होणार नाही आणि दुसरे म्हणजे उत्त्पनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल हे निश्चित आहे.
तणनाशकांच्या 'Rate Of Herbicide' किंमती मध्ये घट झाल्याने अनेक जन तणनाशकांचा वापर करत आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसांना तणनाशक मुळे अनेक आजारणा तोंड द्यावं लागत म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे
Rate Of Herbicide:-ह्या वर्षी अतिवृष्टी होऊन शेतीपिकाचे भयानक व मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेती पडीक झाल्यात जमा आहे.
त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ही पिके उद्वस्थ झाली आहेत. आणि त्या पिकांमध्ये तणाची वाढ होहून शेती मध्ये भयानक असे नुकसान झाले आहे.
म्हणून या वर्षी " Rate Of Herbicide 2023" तणनाशक ची अत्यंत आवशकता आहे. तणनाशक हे शेतकऱ्यासाठी वरदान म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
तणनाशक हे मानवी शरीरासाठी जरी धोकादायक असेल तरी मजुरीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत
सापडला आहे दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे जगणे कठीण होऊन बसले आहे.
अश्या परिस्थितीत तन मारणे आवश्यकच आहे त्यामुळे तननाशकां शिवाय शेतकऱ्यांना दुसरा कोणताच पर्याय नाही हे विशेष.
टीप :- तणनाशक हे मानवी शरीरासाठी धोकादायक आहे.तणनाशक हे मनुष्य तसेच जमिनी साठी सुद्धा धोक्याचे आहे त्यामुळे होईल तेवढ तणनाशक वापरणे टाळावे.
बाजारात चांगल्या प्रकारचे तण काढणी यंत्र मिळतात ते वापरून पहावे.

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.