Wednesday, February 7, 2024

लेक लाडकी योजनेतुन मुलीला मिळणार 75000 रूपये. Lek Ladki Yojna - 2024

Lek ladki Yojna - 2024:-

💁 राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर केला.

महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली होती.ज्याला लेक लाडकी योजना असे नाव देण्यात आले आहे.

Lek ladki yojna - 2024
Lek Ladki yojna - 2024

💰 या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करनार आहे.

लेक लाडकी योजना 2024 राज्य शासनाने घोषित केलेली योजना आहे. या योजनेबद्दल आधी फक्त घोषणा करण्यात आली होती परंतु  ही योजना महाराष्ट्सनाने आता महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे अंमलबजावणी केली आहे.

तर ही लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, फायदे, नियम व अटी अर्ज अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तर या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता. या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज कुठे मिळेल अर्ज कुठे करायचा असे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लेख संपूर्ण अचूकपणे वाचा.

Lek Ladki Yojna - 2024:-

महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना 2023 च्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत आणि त्या प्रौढ होईपर्यंत सरकार आर्थिक मदत करनार आहे.

जोपर्यंत मूल अल्पवयीन होत नाही, तोपर्यंत सरकारच्या या योजनेचा लाभ मिळत राहनार आहे.

👉 लेक लाडकी योजनेचा उद्देश

● राज्यातील आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणाऱ्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना उच्च शिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
 
● महिला व मुलींबाबत समाजात निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलून भ्रूणहत्येसारखे गुन्हे थांबवणे. 


• माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधि-क्रमण करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास राज्य शासनाच्या निर्णयान्वये 'Lek Ladki Yojna - 2024' ला मान्यता देण्यात आली आहे.

-> मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
-> मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
-> मुलींच्या मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
-> कुपोषण कमी करणे.
-> शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शून्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे.

 
योजनेत आर्थिक मदत कशी मिळेल

● महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक ज्या कुटुंबात मुलींचा जन्म झाला आहे, त्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना ₹ 5000 ची आर्थिक मदत दिली जाईल.

● त्यानंतर मुली शाळेत जाऊ लागल्यावर, नंतर पहिल्या वर्गात त्यांना सरकारकडून ₹ 4000/- ची आर्थिक मदत दिली जाईल.

● जेव्हा ते सहावीच्या वर्गात प्रवेश करतात तेव्हा त्यांना ₹ 6000/- ची मदत दिली जाईल.

● त्यानंतर जेव्हा ते 12 व्या वर्गात प्रवेश करतात तेव्हा त्यांना ₹ 8000/- ची मदत दिली जाईल. 

● आणि जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा तिला ₹75000/- ची एकरकमी रक्कम दिली जाईल.


Lek Ladki Yojna - 2024:-


फायदे आणि वैशिष्ट्ये काय 

● लेक लाडकी योजनेंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या सर्व मुलांना लाभ दिला जाईल.
● या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंत शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
● पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलीला 5000/- रुपयांची मदत दिली जाईल.
● पहिलीच्या वर्गातील सर्व मुली शाळेत गेल्यावर त्यांना 4000/- रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल.
● मुलगी जेव्हा सहाव्या वर्गात प्रवेश करेल तेव्हा तिला राज्य सरकारकडून ₹ 6000/- ची मदत दिली जाईल.
● मुली जेव्हा 11वीत प्रवेश करतात तेव्हा 18000/- रुपयांची मदत दिली जाईल.
● याशिवाय मुली 18 वर्षाच्या झाल्यावर त्यांना एकरकमी 75000/- रुपये सरकारकडून दिले जातील.
● आर्थिक मदत मिळवण्यासाठी मुलीच्या पालकांच्या बँक खात्यात एकरकमी रक्कम हस्तांतरित केली जाईल.
● मदतीची रक्कम मिळाल्यानंतर कुटुंबातील मुलाच्या शिक्षणासाठी या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
● म्हणूनच सरकार सर्व मुलींना ₹75000/- आर्थिक मदत म्हणून देणार आहे.
● मुलीचा जन्म शासकीय रुग्णालयात होणे बंधनकारक आहे, योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागेल.
● गरीब कुटुंबातील मुलींचा जन्म हे ओझे समजू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
● या योजनेंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या बालकांना त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
● समाजातील मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी आणि समानता बदलण्यासाठी ही Lek Ladki Yojna - 2024 योजना सुरू करण्यात आली आहे.
● या योजनेंतर्गत राज्यातील सर्व मुलींप्रती सकारात्मक विचार विकसित करण्यात येणार आहे.

📍 लेक लाडली योजने साठी पात्रता

● महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 चा लाभ मिळविण्यासाठी, अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
● लेक लाडकी योजना ही फक्त राज्यातील मुलींसाठी आहे.
● राज्यातील पिवळे आणि केशरी कार्ड विभागातील कुटुंबात जन्मलेल्या मुलीलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
● लेक लाडकी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
● वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल.

📑 आवश्यक कागदपत्रे

१) पालकांचे आधार कार्ड

२) मुलीचे जन्म प्रमाणपत्र

३)पिवळे आणि केशरी रेशन कार्ड

४)उत्पन्न प्रमाणपत्र

५)पत्त्याचा पुरावा

६)जात प्रमाणपत्र

७)बँक खाते

८)मोबाईल नंबर

९)पासपोर्ट आकाराचा फोटो


Lek Ladki Yojna - 2024:-

📲 अर्ज करण्याची प्रक्रिया

लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे संबंधित आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

या योजनेसंबंधीत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे.

ह्या योजनेसाठी अर्जाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या संबंधित अंगणवाडीला भेट द्या व अंगणवाडी सेविकाना  या  "Lek Ladki Yojna - 2024" याबद्दलची माहिती विचारा.

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023 च्या घोषणेमध्ये महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 ची घोषणा केली होती आणि आजपर्यंत सरकारने ही योजना राज्यात लागू केलेली नाही.

 त्यामुळे या योजनेत अर्ज कसा करायचा आणि यासंबंधी अधिक माहिती सरकारने अद्याप दिलेले नाही, जसे आम्हाला सरकारकडून या योजनेशी संबंधित इतर माहिती मिळेल तसं आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहोचवू.

ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेला आहे.👇


No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ...