Pages

Monday, July 31, 2023

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.या दोन्ही या योजना एकत्र करून सरकारने सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. ही योजना सगळ्या साठी मोफत असणार आहे. म्हणून या योजनेचा सर्व जनतेनी लाभ घ्यावा.

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)
Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता पाच लाखाचे आरोग्य संरक्षण कवच!महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लक्ष रुपयावरून पाच लक्ष रुपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता त्यानुसार एकत्रित योजना अंमलबजावणीचा शासन निर्णय दिनांक 28 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


या योजनेत राज्यातील 1000 रुग्णालयाचा सहभाग असून आजारांची संख्या 996 वरून 1356 इतकी करण्यात आली असून राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून 1000 रुग्णालयाचा सहभाग असून, राज्यातील शासकीय व बिगर शासकीय मिळून 1000 रुग्णालयात ही योजना राबविली जात आहे.


Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) :-

गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे तसेच या योजनेच्या उपचाराचे कवच पाच लाख रुपये पर्यंत करण्यात आले.


राज्यात सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्यान्वित आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखाचे आरोग्य विमाचे कवच मिळते मात्र या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच्या योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे त्यांनाच लाभ मिळतो 'Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)' या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही.

गेल्या काही महिन्यापासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित करून विस्तारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबद निर्णय घेण्यात आला आहे.


Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) :-

महात्मा ज्योतीराव फुले योजनेसाठी कोण आहे पात्र.
गट:-अ पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब.

गट:- ब शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब ( शासकीय/निम - शासकीय कर्मचारी यासह ) कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंबियांमध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा ही समावेश होईल.

गट :-क गट :- अ आणि गट:- ब मध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक शासकीय व शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी मुले महिला ज्येष्ठ नागरिक तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्य बाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब.

गट ड :- लाभार्थ्यांच्या अ, ब, क या गटामध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील. रस्ते अपघात जखमी झालेले महाराष्ट्र बाहेरील व देशाबाहेरील रुग्ण आता ही योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब अधिवास प्रमाणपत्र डेमोशील सर्टिफिकेट कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.

शासन निर्णयाचे लाभ व वैशिष्ट्ये राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) या योजनेचा लाभ मिळत होता मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे.


महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती चार्ट 👇
👇👇
योजनेचे नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना
राज्य महाराष्ट्र
योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2017
विभाग आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील गरीब /दुर्लभ घटक
लाभ कॅशलेस आरोग्य सुविधा
योजनेची उधिष्ट गरिबांना आरोग्य सुविधा पुरवणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://www.jeevandayee.gov.in/Marathi_index.jsp
हेल्पलाईन क्रमांक 155388/1800233220


Ayushuman Bharat,Pradhanmantri Jan Arogya Yojna (PJAY):-

अशा प्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लक्ष रुपये आहे.

आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब प्रति वर्ष पाच लक्ष रुपये एवढे करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे.


तसेच दोन्ही योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 तर प्रधानमंत्री जना आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार उपलब्ध आहेत.

त्यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आले आहेत तर मागणी असलेले 328 उपचारांचा समावेश नव्याने करण्यात येत आहे,

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या 147 ने काढून 1356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत पण 1356 एवढे उपचार समाविष्ट करण्यात येत आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या ही 360 ने वाढविण्यात येत आहेत. या 1356 उपचारापैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयासाठी राखीव राहतील.

महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एकत्रित योजनांमध्ये अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1000 एवढी आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही यादी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमालगच्या महाराष्ट्र राज्यातील 8 आठ जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालय तयार करण्याचा  निर्णय झाला आहे. या व्यतिरिक्त 200 रुग्णालय अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1350 होईल यामध्ये यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय अधिकृत करण्यात येत आहेत या व्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालय अशा रुग्णालयाची इच्छा असल्यास या एकत्रित योजनांमध्ये अंगीकृत करण्यात येतील.

स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या 14 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आली आहे.

उपचारांच्या खर्च मर्यादित 30,000/- वरून प्रति रुग्ण प्रति अपघात एक लक्ष रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे या योजनेचा समावेश 'Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)'  योजनेत करण्यात आला आहे यामध्ये राजाच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.


1 comment:

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.